Saturday, June 11, 2011

तुझ्या सोबत

तुझ्या सोबत पावसात चिंब भिजावस वाटतय
आठवणींच्या ह्या पावसात रमुन जावस वाटतय
पहिल्या पावसाच्या सरित एकत्र चालावस वाटतय
छत्री उडून घेऊन जावी असं वार्‍याला सांगावस वाटतय
फक्त तुझ्यासोबत किनार्‍यावर बसावस वाटतय
ढगाळलेल आभाळ बघून तुला थांबव...ावस वाटतय
किमान पहिल्या पावसात तरी भिजू असं तुला हट्टाने सांगावस वाटतय
चल वेडी करून तू चिडवल्यावर नंतर कुठे असशिल रे ??? करून रुसावस वाटतय
मागून येऊन मिठीत घेऊन तू मला मनवावस अस वाटतय
पावसाच्या ह्या चिंब ऋतुत
तुझ्यासकट भिजावस वाटतय
आठवणीच्या ह्या पावसात रमुन जावस वाटतय.....

No comments:

Post a Comment