आज सोबत नाहीस....
तरीहि ती संध्याकाळ आठवते..
आठवणींची लाट मनांच्या भिंतीवर आदळते...
आठवते, ती तुझ्या चेहेर्याची शांतता..
दुरावा असूनहि मनाची आर्तता....
बोलायचे होते खूप काही...
डोळ्यांनी मात्र अश्रूंचा बांध घातला...
ओठांवर शब्द असूनही...
आठवणीनी कंठ दाटला...
ठाऊक होते पुन्हा कधीच भेटणार नाहीस....
तरीही न बोलता नुसते डोळे भरून पहिले तुला...
दोघेही अबोल असूनही..
मनाचा प्रत्येक शब्द उमजला तुला....
आज तू सोबत नाहीस....
तरीहि ती संध्याकाळ आठवते..
आठणींच्या गर्दीत अजून नाही मी स्वताला शोधते....
आठणींच्या गर्दीत अजून नाही मी स्वताला शोधते....
No comments:
Post a Comment